Skip to product information
1 of 1

KDF INSTANT CHAKALI BHAJNICHE MIX 500G

KDF INSTANT CHAKALI BHAJNICHE MIX 500G

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out

साहित्य: - कोकणस्थ तयार भाजणी चकली पीठ - २ कप , तळण्यासाठी तेल ,मोहनासाठी तूप किंवा तेल - ३ चमचे , मीठ - चवीनुसार , पाणी - आवश्यकतेनुसार

कृती: 1. एका मोठ्या परातीत २ कप कोकणस्थ तयार भाजणी चकली पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका. 2. मोहनासाठी एका पातेल्यात ३ चमचे तूप किंवा तेल गरम करा. ते पीठात मिसळा व व्यवस्थित एकत्र करा. 3. आता या मिश्रणात पाणी घालायला सुरुवात करा. साधारण पीठाच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्या. पाणी हळूहळू घालून, पीठ मऊ व लवचिक होईपर्यंत मळा. 4. मळलेले पीठ १०-१५ मिनिटं झाकून ठेवा, जेणेकरून पीठ सेट होईल. 5. चकलीच्या साच्यात मळलेले पीठ घाला आणि त्यातून गोलाकार चकल्या पाडा. प्लॅस्टिक पेपर किंवा ताटावर या चकल्या ठेवा. 6. कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाले की, मध्यम आचेवर चकल्या तळा. 7. चकल्या सोनेरी रंगाच्या आणि कुरकुरीत झाल्या की, त्यांना बाहेर काढा. 8. तेल निथळण्यासाठी चकल्या कागदावर ठेवा. तयार चकल्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

View full details